Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

मोफत शिष्यवृत्ती मार्गदर्शन

Interjection उद्गारवाचक शब्द उद्गारवाचक वाक्य

 

�� Interjection म्हणजे काय?

�� Interjection म्हणजे उद्गारवाचक शब्द.
�� हे शब्द आपल्या भावना किंवा मनातील भाव लगेच दाखवतात.

�� हे शब्द कधी वापरले जातात?

आनंद झाल्यावर

दु:ख झाल्यावर

आश्चर्य वाटल्यावर

राग आल्यावर

एखादी गोष्ट छान वाटल्यावर

�� Interjection चे काही उदाहरणे:

भावना

इंग्रजी शब्द

मराठी अर्थ

आनंद

Wow!

वा!

आश्चर्य

Oh!

अरे!

दु:

Oh no!

अरे नाही!

राग

Hey!

अगं! / अरे!

कौतुक

Bravo!

शाब्बास!

दुःखद

Alas!

हाय!

 

�� सोपे वाक्य उदाहरणे:

Wow! You are very smart. → वा! तू खूप हुशार आहेस.

Oh no! I lost my toy. → अरे नाही! माझं खेळणं हरवलं.

Bravo! You did it! → शाब्बास! तू केलंस ते!

Hey! Don’t run! → अरे! पळू नकोस!

Alas! The bird is hurt. → हाय! पक्षाला दुखापत झाली आहे.


�� लक्षात ठेवा:

Interjection हे वाक्याच्या सुरुवातीला येतात.

यामध्ये उद्गारवाचक चिन्ह (!) वापरले जाते.

ते भावना व्यक्त करतात, पण पूर्ण वाक्य नसतात.

✏️ सरावासाठी:

�� दिलेल्या भावना पाहून योग्य Interjection लिहा:

आनंद → ___________

दु:→ ___________

आश्चर्य → ___________

कौतुक → ___________

�� वाक्य पूर्ण करा:

_______! You are my best friend.

_______! The glass is broken.

प्रश्न १: योग्य Interjection निवडा आणि पूर्ण वाक्य लिहा

(कंसात दिलेल्या पर्यायांमधून योग्य शब्द निवडा)

1) Wow! / Oh no! / Bravo!)
I got a new bicycle! → _______________________________

2) (Oh! / Hurray! / Alas!)
My team won the game! → _______________________________

3) (Alas! / Wow! / Hey!)
The puppy is hurt. → _______________________________

4) (Bravo! / Oh! / Oops!)

You sang very well. → _______________________________

 

�� प्रश्न २: दिलेल्या भावना ओळखा आणि योग्य Interjection लिहा

भावना

Interjection

एखादी गोष्ट चुकली

____________

शाब्बास म्हणायचं

____________

आश्चर्य वाटलं

____________

वाईट बातमी ऐकली

____________

खूप मजा आली

____________


�� प्रश्न ३: चुकीचा Interjection ओळखा

A. Oh no! I forgot my book.

B. Bravo! My leg is hurting.

C. Alas! The bird is hurt.

D. Wow! You drew a nice picture.

वरीलपैकी कोणता वाक्य चुकीचं आहे आणि का?

�� प्रश्न ४: चित्र बघा आणि Interjection लिहा.प्रत्येक चित्रासाठी योग्य Interjection लिहा आणि एक वाक्य तयार करा.

 

( उदाहरणार्थ: मुलगा आइसक्रीम खाल्ल्याने खुश, मुलीचं खेळणं तुटलं, शिक्षकांनी शाब्बास म्हटलं, .)

Wow! _______________________________________

Oh no! _______________________________________

Bravo! _______________________________________

�� प्रश्न ५: स्वतःचे वाक्य तयार करा

Wow! _______________________________________

Oh no! _______________________________________

Bravo! _______________________________________

Alas! _______________________________________

प्रश्न . योग्य Interjection लिहा

तुला नवीन खेळणं मिळालं तर?

तुझं खेळणं तुटलं तर?

परीक्षेत चांगले गुण मिळाले तर?

तुला वाघ पाहायला मिळाला तर?

एखाद्याने सुंदर गाणं म्हटलं तर?

तू पाण्यात सांडलंस तर?

मित्र अचानक तुझ्या मागे आला तर?

एखादी वाईट बातमी ऐकली तर?

कुणी खूप गोंडस बाळ दाखवलं तर?

तुला सुंदर आकाश दिसलं तर?

 

Bravo!

Oops!

Hey!

Alas!

Aww!

Wow!


 

 

 

उद्गारवाचक शब्द  ( interjuction-इंटरजक्शन  )(केवलप्रयोगी अव्यय )

    बोलणार्या व्यक्तीच्या मनातील आनंद, दुःख, राग, भिती, खेद, शोक, आश्चर्य इत्यादी मनोभावनाची तीव्रता किंवा उत्कटता अशा प्रकाराच्या वाक्यातून व्यक्त होतातत्यांना उद्गारवाचक शब्द , (केवलप्रयोगी अव्यय ) ( interjuction )  म्हणतात. आपण काही अशा  interjuction   विषयी जाणून घेऊया,जे आपण आपल्या दैनंदिन जीवणात संभाषण करत असताना नेहमी वापरत असतो.

 

 

1

Congratulations!

काँग्रॅच्युलेशन्स !

अभिनंदन !

2

Many happy returns of the day!

मेनी हॅपी रिटर्नस् ऑफ

हा दिवस पुनः पुनः येवो ! (वाढदिवसाच्या वेळी)

3

Splendid!

स्प्लेंडीड !

सुरेख !

4

What an idea!

व्हॉट अॅन आयडिया

सुंदर कल्पना !

5

Well done!

वेल डन !

शाबास !

6

Hurry up! Please!

हरी अप, प्लीज !

लवकर, लवकर !

7

Make haste, please!

मेक हेस्ट, प्लीज !

लवकर, लवकर !

8

Hurry up! Walk fast!

हरी अप ! वॉक फाष्ट

लवकर आटप / भरभर पाय उचल !

9

Welcome, Sir!

वेलकम, सर !

या, साहेब !

10

I dare say!

आय डेअर से !

माझं मत असं आहे !

11

Fantastic!

फॅटॅस्टीक !

फारच अदभूत !

12

How sad!

हाऊ सॅड !

फार दुःखाची गोष्ट !

13

How joyful!

हाऊ जॉयफुल !

फार आनंदाची बातमी !

14

Thank God!

बँक गॉड !

देवाचे उपकार !

15

How dare he!

हाऊ डेअर ही !

त्याची एवढी हिंमत !

16

Done wonderfully!

डन वंडरफुली !

तुम्ही तर कमाल केलीत !

17

For your good health!

फॉर युअर गुड हेल्

तुमच्या आरोग्यासाठी

18

How disgusting!

हाऊ डिस्गस्टिंग।

छी, छी !

19

Beautiful!

ब्युटीफुल !

खूप सुंदर !

20

Of course!

ऑफ कोर्स !

खुशाल !

21

Is it!

इज इट !

खरोखरीच !

22

Really!

रिअली !

खरेच !

23

Beware!

बिवेअर !

खबरदार !

24

What a surprise!

व्हॉट ए सरप्राइज

केवढे आश्चर्य !

25

How lovely!

हाऊ लव्हली !

किती सुंदर !

26

What a shame!

व्हॉट ए शेम !

किती शरमेची गोष्ट !

27

How weak you have become!

हाऊ वीक यू हॅव विक

किती रे वाळलास / ग वाळलीस !

28

What a great victory!

व्हॉट ए ग्रेट व्हिक्टरी

किती मोठा विजय !

29

How terrible!

हाऊ टेरिबल !

किती भयंकर !

30

How tragic!

हाऊ ट्रॅजिक ।

किती दुःखदायी !

31

How sweet!

हाऊ स्वीट !

किती गोड !

32

What a pity!

व्हॉट ए पिटी।

किती करुणास्पद गोष्ट !

33

What nonsense!

व्हॉट नॉनसेन्स !

किती आचरट !

34

Says you!

सेझ यू !

काऽऽय म्हणतो !

35

Thank God!

बँक गॉड !

ईश्वराचे आभार !

36

By God's grace!

बाय गॉडस् ग्रेस !

ईश्वराची कृपा !

37

Wonderful!

वंडरफुल !

आश्चर्यजनक !

38

Please keep quiet!

प्लीज कीप क्वाएट

आवाज करू नका !

39

Quiet, please!

क्वाएट, प्लीज !

आवाज करू नका !

40

Thanks!

थैंक्स् !

आभार !

41

Thank you!

थैंक यू !

आपले आभार !

42

Hurrah! I have won!

हुर्रा ! आय हॅव वन

अहा ! मी जिंकलो !

43

How dare you say that!

हाऊ डेअर यू से दंट

असे बोलायची तुला हिंमत कशी झाली !

44

Oh dear!

ओ डिअर !

अरेच्या !

45

Oh God!

ओ गॉड !

अरे राम !

46

Good heavens!

गुड हेवन्स !

अरे देवा ! (आश्चर्याने)

47

Hey!

हे!

अरे !

48

Yes, it is!

बेस, इट इज !

अगदी बरोबर !

49

My God!

माय गॉड !

 हाय !

50

Marvellous!

माव्र्व्हलस !

 वाहवा !

51

Same to you!

सेम टूयू !

 तुमच्यावरही !

52

Excellent!

एक्सलन्ट !

 खूप छान !

53

How disgraceful!

हाऊ डिसग्रेसफुल !

 किती लाजिरवाणी गोष्ट !

54

How absurd!

हाऊ अॅब्सर्ड !

 किती निरर्थक !

55

Hellow! Listen!

हेलो ! लिसन !

 ऐका !

56

May god bless you!

मे गॉड ब्लेस यू !

 ईश्वराची तुमच्यावर कृपादृष्टी असो !


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या