Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

मोफत शिष्यवृत्ती मार्गदर्शन

शालेय परिपाठ मराठी (Shaley Paripath Marathi)

  

शालेय परिपाठ मराठी (Shaley Paripath Marathi)

नमस्कार शिक्षक मित्रांनो!

आजच्या या लेखात आपण आदर्श शालेय परिपाठ (Shaley Paripath) कसा घ्यावा याबद्दल चर्चा करणार आहोत. शालेय परिपाठ हा शाळेतील दैनंदिन कार्यपद्धतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अनुशासन, राष्ट्रप्रेम, नैतिक मूल्ये आणि सामान्यज्ञानाचा विकास होतो.

ज्या दिनांकाचा  परिपाठ पाहायचा आहे. त्या दिनांकावर क्लिक केल्यावर आपल्याला त्या दिनांकाच्या परिपाठाची माहिती मिळेल. शेवटी दिनदर्शिका दिली आहे. पेज स्क्रोल करा.

परिपाठ म्हणजे काय?

"शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व शिक्षक-विद्यार्थी एकत्र येऊन राष्ट्रगीत, प्रार्थना, प्रतिज्ञा, पंचांग, दिनविशेष, सुविचार इत्यादी घेतल्या जातात. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार रुजविण्याचा प्रयत्न केला जातो. यालाच परिपाठ असे म्हणतात."


परिपाठ घेण्याची योग्य रूपरेषा

शालेय परिपाठ योग्य पद्धतीने घेतला गेला पाहिजे. खालील क्रमानुसार परिपाठ घेण्याची शिफारस केली जाते:

  1. सावधान – विश्राम आज्ञा

  2. राष्ट्रगीत

  3. प्रार्थना

  4. प्रतिज्ञा

  5. भारताचे संविधान

  6. पंचांग (तारीख, वार, हंगाम इ.)

  7. सुविचार

  8. दिनविशेष (राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय सण किंवा महापुरुषांची जयंती/पुण्यतिथी)

  9. ठळक बातम्या (देश-विदेशातील महत्त्वाच्या घटना)

  10. सामान्य ज्ञान (GK प्रश्न-उत्तर)

  11. इंग्रजी स्पेलिंग

  12. पाढे (गणितीय सारणी)

  13. पसायदान व गुरुमंत्र

  14. राज्यगीत (जय जय महाराष्ट्र माझा)

  15. मौन (१-२ मिनिटे शांतता)

  16. विसर्जन (परिपाठ संपवणे)

ज्या दिनांकाचा  परिपाठ पाहायचा आहे. त्या दिनांकावर क्लिक केल्यावर आपल्याला त्या दिनांकाच्या परिपाठाची माहिती मिळेल.

जून २०२५

रवि 

सोम

मंगळ

बुध

गुरु

शुक्र

शनि

1

2

3

4

5

6

7

8

9

10

11

12

13

14

15

16

17

18

19

20

21

22

23

24

25

26

27

28

29

30

 

 

 

 

 

जुलै  २०२५

रवि 

सोम

मंगळ

बुध

गुरु

शुक्र

शनि


   

1

2

3

4

5

6

7

8

9

10

11

12

13

14

15

16

17

18

19

20

21

22

23

24

25

26

27

28

 29    

 30

 31

 

 



1. सावधान – विश्राम आज्ञा

  • विद्यार्थ्यांना रांगेत उंचीप्रमाणे उभे करावे.

  • एका हाताचे अंतर ठेवून सावधान स्थितीत उभे राहण्यास सांगावे.

  • ऑर्डर देणाऱ्या विद्यार्थ्याने "एक साथ सावधान! एक साथ विश्राम!" अशी आज्ञा द्यावी.

2. राष्ट्रगीत

  • "जन गण मन..." हे राष्ट्रगीत सर्वांनी एकत्रितपणे म्हटले पाहिजे.

  • मोबाइलवर ऑडिओ चालू करून सुद्धा म्हणवता येते.

3. प्रार्थना

  • वारानुसार वेगवेगळ्या प्रार्थना म्हणाव्यात.

4. प्रतिज्ञा

  • मराठी प्रतिज्ञा:
    "भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत..."

  • हिंदी प्रतिज्ञा:
    "भारत मेरा देश है..."

  • इंग्रजी प्रतिज्ञा:
    "India is my country. All Indians are my brothers and sisters..."

5. भारताचे संविधान

  • "आम्ही भारताचे नागरिक..." ही प्रतिज्ञा मोठ्या आवाजात म्हणावी.

6. पंचांग

  • तारीख, वार, हंगाम, वर्ष याची माहिती द्यावी.

    • उदा: "आजची तारीख १५ सप्टेंबर २०२४, रविवार, शरद ऋतू."

7. सुविचार

  • दररोज एक नवीन सुविचार सांगावा.

    • उदा: "विद्या हीच खरी संपत्ती आहे."

8. दिनविशेष

  • जर एखादा महत्त्वाचा सण किंवा पुण्यतिथी असेल, तर त्याबद्दल माहिती द्यावी.

    • उदा: "आज शिक्षक दिन आहे."

9. ठळक बातम्या

  • देश-विदेशातील महत्त्वाच्या घटनांवर चर्चा करावी.

10. सामान्य ज्ञान (GK)

  • दररोज २-३ सोपे प्रश्न विचारावेत.

    • उदा: "भारताची राजधानी कोणती?"

11. इंग्रजी स्पेलिंग

  • दररोज २-३ इंग्रजी शब्दांची स्पेलिंग सांगावी.

    • उदा: "School – S-C-H-O-O-L"

12. पाढे

  • गणितीय सारणी (२ ते १० पर्यंत) म्हणवावी.

13. पसायदान व गुरुमंत्र

  • संत ज्ञानेश्वरांचे "पसायदान" आणि गुरुमंत्र म्हणवावे.

14. राज्यगीत

  • "जय जय महाराष्ट्र माझा..." हे गीत म्हणावे.

15. मौन

  • १-२ मिनिटे शांत बसून ध्यान करावे.

16. विसर्जन

  • "परिपाठ संपला, धन्यवाद!" असे सांगून विद्यार्थ्यांना वर्गात जाण्यास सांगावे.


शालेय परिपाठ हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा आहे. यामुळे त्यांच्यामध्ये अनुशासन, ज्ञान आणि संस्कार यांचा विकास होतो. म्हणून प्रत्येक शाळेने नियमितपणे सुव्यवस्थित परिपाठ घ्यावा.

"शिक्षणाची सुरुवात चांगल्या परिपाठाने होते!"

📌 WhatsApp Group Join Now – शालेय परिपाठाशी संबंधित अधिक माहितीसाठी आमच्या गटात सामील व्हा!

📌  Telegram group link  इथे क्लिक करून Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. 

धन्यवाद! 🎓📚

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या