Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

मोफत शिष्यवृत्ती मार्गदर्शन

समूहदर्शक शब्द

समूहदर्शक शब्द


क्र.

शब्द

समूहदर्शक शब्द

1.

लोकांची

गर्दी, जमाव

2.

फुलांचा
Fulancha Samuh Darshak Shabd

गुच्छ

3.

लमाणांचा / उंटांचा

तांडा

4.

उतारूंची

झुंड, झुंबड

5.

वाळूचा

ढीग

6.

तारकांचा

पूंज

7.

किल्ल्यांचा

जुडगा

8.

लोकप्रतींनिधीची

संसद

9.

साधूंचा

जथ्था

10.

आदिवासींचा

समूह

11.

केळीचा

घड

12.

लतावेळीचा

कुंज

13.

पक्षांचा

थवा

14.

मधमाशांचे

मोहोळ

15.

वारकर्यांची

दिंडी

16.

संतांची

मांदियाळी

17.

मुंग्यांची

रांग

18.

वाचकांचा

मेळावा

19.

सैनिकांची

पलटण, तुकडी

20.

लाकडाची

मोळी

21.

खेळाडूचा

संघ

22.

जहाजांचा

काफिला

23.

वस्तूंचे

भांडार

24.

वानरांची / माकडांची

टोळी

25.

माणसांचा

घोळका

26.

दरोडेखोरांची

टोळी

27.

विमानांचा

ताफा

28.

मेंढरांचा

कळप

29.

भाकरीची / पोळ्यांची

चवळ

30.

महिलांचे

मंडळ

31.

करवंदीची

जाळी

32.

भाताची

लोंबी

33.

हत्तीचा

कळप

34.

गवताची

पेंढी, गंजी

35.

गव्हाची

ओंबी

36.

पोत्यांची

थप्पी

37.

गुलाबांचा

ताटवा

38.

काजूंची

गाथण

39.

भक्तांची

रांग, लोंढा

40.

मडक्यांची

उतरंड

41.

फळझाडयांचे

उपवन

42.

आंब्यांची

आढी

43.

तार्यांची

आकाशगंगा

44.

घोड्यांची

तुकडी

45.

पंत्यांची

माळ, आरास

46.

द्राक्षांचा

घड, घोस

47.

केसांचा

झुबका

48.

खाटिकांची

चाळ

49.

विचारवंतांची

परिषद

50.

खेचरांचे

टोळके

51.

केसांची

बट

52.

प्रश्नपत्रिकांचा

संच

53.

केळ्यांचा

लोंगर

54.

घरांची

चाळ, आळी

55.

हरणांचा

कळप

56.

ढगांचे

घनमंडल

57.

नोटांचे

पुंडके

58.

विटांचा

ढिगारा

59.

उपकरणांचा

संच

60.

कवितांचा

संग्रह

61.

नावांची

यादी, सूची

62.

खारकांचा

ढीग

63.

पालेभाज्यांची

गड्डी

64.

कार्यकर्त्यांची

संघटना

65.

नारळाची

पेंड

66.

बालवीरांचे

पथक

67.

आंब्याच्या झाडांची

राई

68.

गंथप्रेमींचे

साहित्य संमेलन

69.

फळांचा

घोस

70.

कालिंगडाचा

ढीग, डोंगर

71.

फुलझाडांचा

ताटवा

72.

दूर्वाची

जुडी

73.

धान्याची

रास

74.

आंब्याची

अढी

75.

नाण्यांची

चळत

76.

केसांचा

पुंजका

77.

भांड्यांची

उतरंड

78.

मुंग्यांची

रांग

79.

विद्यार्थ्यांचा

गट

80.

प्रवाशांची

झुंबड

81.

समूहदर्शक शब्द बांबूचे

बेट

82.

वाद्यांचा

वृंद

83.

ऊसाची

मोळी

84.

वह्या-पुस्तकांचा

गठ्ठा

85.

वेलींचा

ताटवा, कुंज

86.

माशांची

गाथण

87.

गुरांचा समूहदर्शक शब्द / गाईगुरांचे

खिल्लार

88.

कडब्याची

पेंढी

89.

समूहदर्शक शब्द मुलांचा

घोळका

90.

समूहदर्शक शब्द भाजीची

जुडी

समूहदर्शक शब्द स्वाध्याय

 

प्र. 1) रिकाम्या जागी योग्य समूह दर्शक शब्द | Samuh Darshak Shabd निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.

1. सकाळ झाली की पक्ष्यांचा …… आकाशात दिसू लागतो.
() कळप () गट () पुंजका () थवा

2. पूर्वी घराघरात मडक्यांची …… असे.
() रास () उतरंड () थप्पी () अढी

3. जंगलातील प्राणी …… करून राहतात.
() गट () घोळका () कळप () जमाव

4. दुकानात नारळांचा …… पडला होता.
() घोस () जुडगा () घड () ढीग

5. वारुळाजवळ मुंग्यांची …… लागली होती.
() रास () झुंबड () रांग () कळप

प्र. 2) दिलेला समूह दर्शक शब्द |कोणत्या गटासाठी वापरला जातो तो निवडा.

1. गुच्छ : () गवताचा () भाजीचा () दुर्वांचा () फुलांचा

2. ताफा : () प्राण्यांचा () विमानांचा () माणसांचा () पक्ष्यांचा

3. राई : () नारळांची () फुलांची () केळ्यांची () आम्रवृक्षांची

4. झुंबड : () उतारुंची () मुंग्यांची () पक्ष्यांची () गाड्यांची

5. तुकडी : () वाहनांची () भाज्यांची () सैनिकांची () चोरांची

6. टोळी : () मुंग्यांची () पोलिसांची () शिक्षकांची () चोरांची

स्पेलिंग कशी तयार करावी, लहान मुलांसाठी

समूह दर्शक शब्द

योग्य समूह दर्शक शब्द  निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.

1. जसे लाकडांची मोळी, तसा किल्ल्यांचा ……..
() ताटवा () जुडगा () जुडी () गुच्छ

2. दिलेल्या समूह दर्शक शब्द शी न जुळणारा पर्याय निवडा.
ढीग: () विटांचा () दगडांचा () माणसांचा () कालिंगडांचा

3. गटाशी न जुळणारा पर्याय निवडा.
() झुंड () थवा () जमाव () मोळी

4. अधोरेखित शब्दाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

धान्याचा मोठा ढीग बाजारात लागला होता.
() साठा () संच () रास () चळत

5. जसे, गवताची गंजी; तशी ……. जुडी. (2017)
() केसांची () पानांची () फळांची () पालेभाजीची

6. जशी प्रवाशांची झुंबड, तशी माशांची ……. (2018)
() रास () जुडी () थप्पी () गाथण


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या